IPL 2025 Schedule : प्रतिक्षा संपली! आयपीएलच्या 18 व्या हंगामाची तारीख जाहीर, ‘या’ तारखेला पहिली मॅच

एका बाजूला टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट चाहत्यांना आयपीएल 2025 मेगा ऑक्शनचे वेध लागले आहेत. मेगा ऑक्शन यंदा सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 23 आणि 24 नोव्हेंबरला पार पडणार आहे. त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. मेगा ऑक्शनआधी आयपीएलच्या 18 व्या मोसमाला केव्हापासून सुरुवात होणार? यााबबत मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या आगामी हंगामाला 14 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर 25 मे ला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. अर्थात चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर अवघ्या काही दिवसांनी आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीतील महाअंतिम सामना हा 9 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.

 

👉इथे क्लिक करून पहा👈

 

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, सर्व फ्रँचायझींना ई-मेलद्वारे पुढील तीन सीझनच्या सुरुवातीच्या तारखांची माहिती देण्यात आली होती. या तारखांना लवकरच अधिकृत पुष्टी दिली जाऊ शकते. गेल्या तीन मोसमाप्रमाणे आयपीएल 2025 च्या मोसमात एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे पुढील हंगामात सामन्यांची संख्या वाढवता येऊ शकते. आयपीएल 2026 मध्ये 84 सामने होतील आणि 2027 च्या हंगामात सामन्यांची संख्या 94 पर्यंत वाढवता येईल. सामन्यांच्या संख्येत वाढ होण्याचे कारण मीडिया अधिकार असू शकतात. जर आपल्याला आयपीएल 2024 आठवत असेल, तर ही स्पर्धा 22 मार्च ते 26 मे पर्यंत सुरू होती, ज्याच्या अंतिम फेरीत कोलकत्ता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला.

 

👉इथे क्लिक करून पहा👈

 

आयपीएलच्या सर्व 10 फ्रँचायझींसाठी ही आनंदाची बातमी आहे की जवळजवळ सर्व पूर्ण आयसीसी सदस्य देशांनी त्यांच्या खेळाडूंना पुढील तीन हंगामांसाठी आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. 2025 च्या मेगा लिलावापूर्वी बीसीसीआयने एक नवीन नियम जारी केला होता. या अंतर्गत, जर कोणताही परदेशी खेळाडू मेगा लिलावाचा भाग झाला नाही तर तो पुढील दोन हंगाम खेळू शकणार नाही. दुसरीकडे, लिलावात खरेदी केल्यानंतर परदेशी खेळाडूने आपले नाव मागे घेतल्यास त्याला दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागण्याची तरतूद आहे.

Leave a Comment