Jio New

जिओच्या लिस्टमधील परवडणारा रिचार्ज प्लॅन जिओच्या पोर्टफोलिओमधला 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. हा प्लॅनची किंमत 799 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंगची ऑफर दिली जाते. तुम्ही हा प्लॅन घेतल्यास, तुम्ही एकाच वेळी जवळपास 3 महिन्यांसाठी रिचार्जच्या त्रासापासून मुक्त होऊ शकता. फ्री कॉलिंगसोबत, जिओ आपल्या ग्राहकांना दररोज 100 फ्री एसएमएसची सुद्धा सुविधा देत आहे. दररोज 1.5GB डेटा वापरता येणार या 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा ऑफरबद्दल बोलायते झाल्यास, यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी एकूण 126GB डेटा मिळतो. यामध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा वापरता येणार आहे. दरम्यान, लक्षात असू द्या की, जिओचा हा प्लॅन अनलिमिटेड टू 5G डेटा ऑफरसह येत नाही. त्यामुळे तुम्हाला यामध्ये फ्री 5G डेटाचा लाभ मिळणार नाही.