Online Application

व्हीआयपी क्रमांकासाठी ऑनलाईन अर्ज (Online Application For VIP Number)
ही सुविधा 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाली आहे, ज्यामध्ये तुम्ही परिवहन वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता आणि शुल्क ऑनलाईन भरू शकता. एजंटची गरज दूर व्हावी आणि लोकांना त्यांच्या पसंतीची नंबर प्लेट थेट मिळावी यासाठी परिवहन विभागानं नंबर प्लेटची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.

VIP नंबरसाठी फी किती? (How Much is Fee For VIP Number?)
महाराष्ट्रात तुम्हाला वेगवेगळ्या व्हीआयपी नंबर्ससाठी लाखो रुपये चुकवावे लागू शकतात.

जर तुमच्याकडे चार चाकी गाडी असेल, तर या गाडीचं रजिस्ट्रेशन करुन ‘1’ नंबर घेण्यासाठी तुम्हाला तब्बल 6 लाख रुपये द्यावे लागतील.
याच नंबरची टू व्हीलर घेण्यासाठी तब्बल 1 लाख रुपये मोजावे लागतील.
तेच 99, 999, 786, 9999 यांसारख्या नंबर्ससाठी 50,000 ते 2.5 लाख रुपये फी द्यावी लागते.
इतर व्हीआयपी नंबर्ससाठी तुम्हाला 25,000 ते 1 लाख रुपये खर्च करावे लागतात.